Saturday, 30 June 2012














विठ्ठला... तू झाला हायजॅक  !!

आज सुरुवात कुठून करावी तेच कळत नव्हते
विषय फार संवेदनशील आणि तितकाच भावनीक आहे
आज आषाढि-एकादशी
तीकडे पंढरपुरात विठ्ठल भक्तांच्या भक्तिचा पुर आला असेल.
भाविक शेकडो मैलांचे अंतर पायी तुडवून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला येतात
मात्र शेकडो मैल चालत आलेल्या वारकरी बांधवाना त्यांचा विठ्ठल भेटतो का ?
कशा स्वरुपात भेटतो? का नुसतेच क्षणिक समाधान?
त्याच्या भेटिच्या ओढिने येणारे लोक त्यास नवस बोलून साकडे घालू लागली आहेत
इतकेच काय महाराष्ट्रराज्याचा खुद्द मुख्यमंत्री जेव्हा तीथे 'शासकिय पुजा' करतो
आणि राज्याच्या विकासासाठी साकडे घालतो तेव्हा हे गांभिर्याने पहावे लागते.
ब्राह्मणी कर्मकांडात आज विठोबा गुरफटून गेला आहे.

आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नानें जे करिती ॥
दर्शनहेळामात्रेतयां होय मुक्ती ॥केशवासी नामदेव भावें ओंवाळीती
खरेच असे होते काय?  केवळ दर्शनाने पाप क्षालन, प्रायश्चित्त, मुक्ति वगैरे साध्य होते?

भागवत धर्माची पताका काश्मिर ते कन्याकुमारी नेणार्‍या नामदेवांनाही
असे कधी वाटले नसेल की ,खुद्द विठोबालाच कुणी हायजॅक करु शकेल.

भागवत धर्म आणि हिंदु धर्म हे मुळातच भिन्न दैवते ,प्रतिकं/ भिन्न अध्यात्मिक विचार
आणि विषमता व समानतेची भिन्न व्याख्या या पायायावर आधारलेले.
तरीही हिंदुत्वाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहेत ते
भागवत धर्म हा हिंदु धर्माचीच एक शाखा आहे असे
जनसामान्यांच्या मनावर ठसविण्याच्या प्रयत्नात असतात.
इतकेच काय तथागत भगवान बुद्ध हा विष्णूचाच अवतार असल्याचे ठोकून देतात.
कालच स्टारमाझावर वा.ना. उत्पात यांनी असे बालिश वक्तव्ये करुन उत्पात  केला.
एव्हढ्यावरच न थांबता बुद्धधम्म हा ही  हिंदुधर्माचीच एक शाखा आहे  असे ते समजतात.

अख्यायीका-
विठ्ठल हा भक्त पुंडलीकाला दर्शन देण्यासाठी तो अवतीर्ण झाला
त्या वेळी पुंडलीक भीमा नदीच्या तीरावरील वाळवंटात
आपल्या मातापित्यांची सेवा करीत होता.
ती अर्ध्यावर सोडून प्रत्यक्ष भगवंताला भेटायलासुद्धा तो तयार नव्हता.
पण आलेल्या पाहुण्याचे स्वागत तर केले पाहिजे.
त्या ठिकाणी त्याला बसण्यासाठी पाट किंवा सतरंजी तो कोठून आणणार?
 त्याने जवळच पडलेली एक वीट श्रीविष्णूच्या दिशेने भिरकावून दिली
आणि तिच्यावर थोडा वेळ उभे राहण्याची विनंती केली.
त्या विटेवर उभा राहून तो 'विठ्ठल' झाला तो कायमचाच.
अवतरणे’ म्हणजे वरून खाली येणे एवढा अर्थ घेतला तर विठ्ठल हा सुद्धा एक
अवतार’ ठरू शकतो, पण या अवतारात त्याने त्यापूर्वीच्या परशुराम,
रामचंद्र व श्रीकृष्ण यांच्यातल्याप्रमाणे मानवी मातापित्यांच्या घरी जन्म घेतलेला नाही.
विठ्ठलाच्या नांवाला बहुधा शास्त्रपुराणांचा आधार नसावा.
त्यामुळे विष्णूच्या दशावतारांच्या यादीत त्याचे नांव नाही
तसेच केशव, नारायण, माधव इत्यादी त्याच्या ज्या चोवीस नांवांना पूजाविधीमध्ये सारखा नमस्कार केला जातो
त्यातही विठ्ठल हे नांव नाही. इतकेच नव्हे तर विष्णूसहस्रनामांत देखील त्याचा समावेश नाही.
मग नेमके काय समजावे?
इथेहि स्वतःला हुशार समजणार्‍या तथाकथीत लोकांनी
आपल्या स्वार्थासाठी बनवाबनवी तर केली नसावी?

विठ्ठलाचे  दृश्यरूप हे  इतर कल्पित देवांहून भिन्न आहे.
तो "विटेवरी उभा, कटेवरी हात।" असा पूर्णतया मानवी आहे.
गणपती गजमुख,विष्णू चतुर्भुज, शंकर त्रिनेत्र, ब्रह्मा,दत्त त्रिमुखी, हे सगळे देव 'अमानवी' आहेत.
विठोबाला ताप येणे, त्यास वज्र लेपन करणे,
अभिषेक करणे हे सर्व कर्मकांड हिंदुंनी त्यात घुसखोरी केल्यामुळेच
अन्यथा मुळ वारकर्‍यांना आणि खुद्द विठोबालाही असले कर्मकांड अपेक्षित नसावे.
त्यामुळे पुर्वपार वारकरी आणि बडवे यांच्यात संघर्षहि होत आलेला आहे.
विवेक हा संतांचा स्थायीभाव असतो,
विवेकाच्या चार गोष्टी जगाला समजावून सांगणे हे संतांचे जीवनकार्य.
आता, सारासारविवेकाने वागणे हे सोपे नसते.
त्यासाठी मूळ स्वभावप्रवृत्तींना मुरड घालावी लागते.
हाच विरोधाभास संत आणि सामान्यजनांमध्ये पक्षी वारकर्‍यांमध्ये पहायला मिळतो
ज्ञानेश्वरांच्या पालखी-दिंडीत तुकारामांचे अभंग म्हणल्यामुळे पार मारामार्‍या झाल्या होत्या.
अर्थात भागवत धर्मावर हिंदु धर्माचे प्राबल्य असल्यामुळेही
अशा गोष्टि घडल्या असाव्यात असे म्हणता येऊ शकते.

समाजातच राहून, समाजाबरोबरच चालून-सवरून
मूल्यांकित जीवनशैलीचा आदर्श आपल्या जगण्याद्वारे समाजासमोर ठेवायचा,
ही संतांच्यासाठी अनिवार्य बाब आहे.
स्वतःला काहीही मिळवायचे नसले तरी
समाजाला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी संतांना लोकसंग्रह आवश्यकच आहे,
हा भागवत धर्माच्या शिकवणुकीचा गाभा.
परंतू मुळ स्त्रोतच जर 'अवतारी' (चमत्कारी) असेल तर तो पुढिल काळात टिकणे कठिण आहे.
आणि त्यामुळे अनुयायी मग विवेक हरवुन परावलंबी होतात.
आपण या गोष्टि विचारात घेत नाही.
यातूनच मग अशा प्रतिकांचे,दैवतांचे बाजारीकरण होण्यास सुरुवात होते.
आणि मग "गावोगावी जी साई ची मंदिरे आहेत ती खोटि (duplicate) आहेत.
शिर्डि हेच साईचे मुळ मंदिर आणि वास्तव्य असे शिर्डि संस्थानाला जाहीर करावे लागते.
 उद्या विठ्ठलाला हिरेजडीत सोन्याच्या विटेवर उभे केले आणि तेथील बडव्यांनी
"आमचाच विठ्ठल खरा आहे,दुसरी मंदिरे नकली आहे येथेच या. "
असे जाहीर केले तर आश्चर्य वाटायला नको.

यात एक मुद्दा महत्वाचा वाटतो, संत निर्मितीची प्रक्रिया थांबली आहे असे कुठे तरी वाटत राहते
जे काही संतनिर्मित साहित्य आहे ते परंपरागत पुढे चालत आले आहे,
पण अलिकडच्या काळात त्यातही काही नवनिर्मिती झालेली नाही.
त्यामुळे विठोबा ब्राह्मणी जोखडातून मुक्त करायला हवा.
भागवत धर्माचा पाया हा
'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।
या तत्वावर आधारलेला असला तरी केवळ अशी भजने करुन / साहित्य निर्मिती करुन
समाज शहाणा होणे नाही , त्यास प्रत्यक्ष कृतीची गरज असावी लागते,
संत परंपरेने  चौकटित राहूनच त्यांचे कार्य केले,
विष्णु देवाने वर्ण व्यवस्था जन्माला घातली असे विष्णु पुराणात म्हणले आहे,
त्यामुळे मुळात चौकटच विषमतेने ग्रासलेली होती तीथे सामाजीक परिणाम काय साधणार?
भागवत धर्म टिकावयाचा असेल तर त्यांनी
कर्मकांड, ब्राह्मणी भेद-भावयुक्त संस्कार सोडून
विज्ञानाची कास धरावी तर तो येत्या काळात टिकू शकेल.


           

3 comments:

  1. विचार करायला प्रवृत्त करणारा..... या विषयासंबधी अधिक माहिती वाचण्यास प्रवृत्त करणारा हा लेख आहे.
    धन्यवाद.
    सर्वात जास्त आवडलेले वाक्य म्हणजे -

    विवेकाच्या चार गोष्टी जगाला समजावून सांगणे हे संतांचे जीवनकार्य. आता, सारासारविवेकाने वागणे हे सोपे नसते. त्यासाठी मूळ स्वभावप्रवृत्तींना मुरड घालावी लागते.

    समाजातच राहून, समाजाबरोबरच चालून-सवरून मूल्यांकित जीवनशैलीचा आदर्श आपल्या जगण्याद्वारे समाजासमोर ठेवायचा, ही संतांच्यासाठी अनिवार्य बाब आहे. स्वतःला काहीही मिळवायचे नसले तरी समाजाला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी संतांना लोकसंग्रह आवश्यकच आहे,

    'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ। या तत्वावर आधारलेला असला तरी केवळ अशी भजने करुन / साहित्य निर्मिती करुन समाज शहाणा होणे नाही , त्यास प्रत्यक्ष कृतीची गरज असावी लागते,

    आपले खाली माडलेले मत पटले नाही -
    भागवत धर्म आणि हिंदु धर्म हे मुळातच भिन्न दैवते ,प्रतिकं/ भिन्न अध्यात्मिक विचार आणि विषमता व समानतेची भिन्न व्याख्या या पायायावर आधारलेले. तरीही हिंदुत्वाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहेत ते भागवत धर्म हा हिंदु धर्माचीच एक शाखा आहे असे जनसामान्यांच्या मनावर ठसविण्याच्या प्रयत्नात असतात.

    परंतु या विषयात माहित नसल्यामुळे आता लगेच प्रतिक्रिया देत नाही, नक्कीच त्यावर अधिक वाचन करावे लागेल....

    ReplyDelete
    Replies
    1. राहुलजी
      प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

      माझ्या माहिती प्रमाणे भागवत धर्म हा हिंदु धर्म यात फरक आहे
      या बाबत आपण जरुर अभ्यास करावा

      Delete
  2. http://evivek.com/1july2012/lekh002.html

    ReplyDelete